Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

इंद्रधनु कला अकादमी मोर्शी द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय मराठी -हिंदी फिल्मी गीत गायन स्पधेचे आयोजन मड्घे मंगल कार्यालय मोर्शी

Responsive Ad Here

अमरावती जिल्हा न्यूज प्रतिनिधी हरीश हजारे 


      दि 7 फेब्रुवारी 2021 रोजी  इंद्रधनु कला अकादमी मोर्शी यांच्या वतीने विदर्भ स्तरीय हिंदी मराठी फिल्मी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  स्पर्धेचे उदघाटन सकाळी 10 वाजता मा. सौं मेघनाताई मोहनराव मड्घे नगराध्यक्षा मोर्शी यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकते मा. श्री जगदीशभाऊ जयस्वाल, नगरसेविका मा. सौं छायाताई सुनीलभाऊ ढोले, मा. श्री सुदेशजी हटवार, मा. श्री विनोदभाऊ अजमीरे, व इंद्रधनु कला अकादमी मोर्शी चे आदी सर्व  मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये स्पर्धा कार्यक्रमा चे उदघाट्न करून पुढील स्पर्धा सुरु करण्यात आली. 

    या स्पर्धेमध्ये एकूण 40 स्पर्धकानी भाग घेतला असून यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस कु.प्रगती गुडदे अमरावती यांना इंद्रधनु कला अकादमी कडून रोख 11 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले आणि अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघअमरावती कडून प्रथम पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस चि. तेजस कडू अकोला यांना रोख 7500 रुपये प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री. भारत अंभोरे आकोट यांना रोख 5000 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देन्यात आले आणि उर्वरित एकूण सात विजयी स्पर्धकाना प्रोत्साहन पर 2100 रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन एकूण 10 स्पर्धकाना सन्मानित करण्यात आले. तेव्हा बक्षीस वितरणकरिता मा. सौं मेघनाताई मोहनराव मड्घे नगराध्यक्षा, मा. श्री हरीश हजारे जिल्हाध्यक्ष व मा. श्री राजेश तुपोने जिल्हा सचिव, मा. श्री दिनकरराव तायडे भातकुली तालुका अध्यक्ष. अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघ अमरावती, मा. श्री. प्रभूदासजी फंदे बिल्डर्स अमरावती

     मा. श्री. राजूभाऊ अजमिरे मयुरी टेडर्स मोर्शी, तसेच, इंद्रधनु कला अकादमी चे सर्व संचालक मा. श्री. कैलासजी फंदे, मा. श्री. शिवदासभाऊ काडुकर तालुका अध्यक्ष मोर्शी, मा. श्री. सुनीलभाऊ ढोले. मा. श्री मोहनभाऊ मड्घे, आदी सर्व जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये बक्षीस वितरण करण्यात आले.