Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मोर्शी तालुक्यातील ग्रामीण बस सेवा सुरु करण्याच्या मागणी चे प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटने च्या वतीने आगार प्रमुखास निवेदन

Responsive Ad Here

 रामचंद्र मुंदाने अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

       प्रहार जनशक्ती पक्ष नेरपिंगळाई व स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्शी च्या वतीने विद्यार्थ्यांकरीता मोर्शी नेरपिंगळाई , मोर्शी शिरलस   , तसेच खेड्यापाड्यातील बससेवा तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीचे निवेदन मोर्शी आगारप्रमुखास देण्यात आले . 

      गेल्या काही दिवसापासून शाळा कॉलेज सुरू झाले असून बस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोर्शी येथील शाळा-कॉलेज व शिकवणी वर्गात जाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत असून एसटी बस अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आतापर्यंत कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले . 

    परंतु आता शासनाच्या आदेशान्वये टप्प्याटप्प्याने शाळा कॉलेज सुरू झाले असून . आता बस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . त्याकरिता मोर्शी आगाराने ग्रामीण भागातील बससेवा लवकरात लवकर सुरू करावी या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख व प्रहार रुग्ण समितीचे रुपेश सु गणेश , तालुकाप्रमुख युवा संघटना श्रेयस गावंडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी तालुकाप्रमुख वैभव फुके , आकाश भाऊ गुल्हाने , प्रहार विद्यार्थी तालुकाप्रमुख रवी परतेती , भूषण भोजने , आरती वाकेकर , आदींच्या हस्ते आगार प्रमुखास देण्यात आले.