Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रेती माफियांची दादागिरी, महसूल अधिकाऱ्यांना मारहाण

Responsive Ad Here

 हिवरखेड प्रतिनिधी :-जितेश कारीया

तलाठ्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

     हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत धोंडा आखर येथे रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले असता महसूल विभागाने रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने गावातील नागरिकांना जमवून तलाठ्यांना मारहाण केल्याची घटना बुधवार, १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    धोंडा आखर परिसरात रेतीची अवैध वाहतूक वाढली आहे. याबाबत माहिती मिळाल्याने तलाठी किशोर गायकी, सतीश दांडगे हे बुधवारी धोंडा आखर येथे गेले असता त्यांना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने गावातील जमाव जमवून तलाठ्यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच गावातील काही नागरिकांनी तलाठ्यांवर हल्ला केला, अशा आशयाची तक्रार तलाठी किशोर गायकी यांनी हिरवखेड पोलिसांना दिली. या तक्रारीवरून रात्री उशिरा हिवरखेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 353, 379, 332, 506, 34, इत्यादी कलमान्वये गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.