काशिनाथ शिंदे तालुका प्रतिनिधी
जामनेर /-जळगांव जिल्ह्यातील नामवंत पत्रकार म्हणुन ख्याती असलेले जामनेर शहरासह तालुक्यात सर्वांना पारिचीत असलेले निर्भिड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष- श्री सुनिल दिनकर इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकारिणी निवड बैठकीला पत्रकार-बाळू वाघ,दादाराव वाघ,रत्नाकर जोहरे,अनिल शिरसाठ,साहेबराव क्षिरसागर, अरुण तायडे,इम्रान खान,शाहिद शेख, एजाज शेख,नसीम शेख, पवन साळवे,महेश विसपुते यासह असंख्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत जिल्ह्यासह तालुक्यातील सुदधा कार्यकारणीची घोषणा करून निवड करुन निवडीचे प्रमाण पत्र देण्यात आले .गतकाळातील कोवीड-19 च्या काळात जिवाची बाजी लावून व प्रसंगी परिवाराची चिंता न करता कोरोना सारख्या भयानक परिस्थीत पोलीस यंत्रना, आरोग्य विभागातर्फे आरोग्य सेवा बजाऊन आजारावर नियंत्रण मिळवुन सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याचा विचार हा एकच ध्यास मनाशी धरुन न्याय मिळवुन देण्यासाठी झटत होते . अशा आदर्श अधिकारी वर्गाचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करणे समाजोपयोगी उपक्रम व सदभावना जपल्या बद्दल योग्य सन्मान व्हावा.या विचारांवर चर्चा व सल्ला मसलत करण्यात आली.यावेळी बैठकीत जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील पत्रकारांची जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड घोषित करण्यात आली.
1) रत्नाकर जोहरे -जिल्हा उपाध्यक्ष
2) दादाराव वाघ- जिल्हा सचिव.
3) अनिल शिरसाठ -जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख..
4) काशिनाथ शिंदे--जामनेर तालुकाध्यक्ष..
5) साहेबराव क्षिरसागर -ग्रामीण तालुकाध्यक्ष
6) अरुण तायडे -ग्रामीण उप तालुकाध्यक्ष
7) बाळू वाघ--शहराध्यक्ष
8) ऐजाज शेख उपशहराध्यक्ष.
9) इमरान खाँन- शहर संपर्क प्रमुख.
10) शाहिद शेख -सह संपर्क प्रमुख..
11) नसीम शेख-शहर उपाध्यक्ष.
यासह अन्य सभासदाची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्षांच्या हस्ते उपरोक्त निवड झालेल्या पत्रकारांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निर्भिड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष- सुनिल इंगळे, दादाराव वाघ, साहेबराव क्षिरसागर, अरुण तायडे अनिल शिरसाठ,बाळु वाघ, काशीनाथ शिंदे,वसीम भाई, आयुब खान, रत्नाकर जोहरे, ईम रान खाँन, शाहिद शेख, आदि पत्रकार बांधव उपस्थीत होते .
