Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जळगांव येथील भवानी पेठ परिसरामध्ये अमृत योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे

Responsive Ad Here

 जळगाव  मयूर वागूळदे 

      जळगाव मधील भवानी पेठ बॉम्बे पेंट हाऊस या परिसरामध्ये अमृत योजनेचे काम करीत असताना निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. यामध्ये महापालिकेचे इंजिनियर  हे देखील सहभागी आहेत. स्वतःला अमृत योजनेचे मालक समजत आहेत , लोकांना दमदाटी करणे तसेच अरेरावी करणे अशा प्रकारच्या भाषा पाणीपुरवठ्याचे साहेब करीत आहेत तरी  यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, परिसरातील काही नागरिक तक्रार म्हणून बोलण्यात गेल्यास त्यांना अमृत योजनेच्या जैन यांना फोन लावा जैन यांना बोलवा प्रत्येक वेळेस जैन यांचे नाव घेत आहेत.

     व नागरिकांना धमकावत आहेत गेल्या आठ दिवसापासून भवानी पेठ या परिसरात पाईपलाईन खोदतांना दोन ते तीन पाईप फुटले होते त्यामध्ये नळ धारकांकडून पैसे ची मागणी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर ते पाईप जोडण्यात आले. त्याचप्रकारे एक पाईप कनेक्शन गेल्या आठ दिवसापासून तुटलेली आहे. त्या ठिकाणी मोठ मोठे खडे पडलेले आहे  ज्यामुळे लहान बालक वृद्ध यांना जाण्यास अडचण निर्माण होत आहे व गेल्या आठ दिवसापासून त्यांना पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही आणि अमृत योजनेचे ठेकेदार  स्वतःला जैनचे हस्तक समजून लोकांना दमदाटी करणे व धमक्या देण्याचे काम करीत आहेत. यांच्या नेहमीच या वागण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तरी त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. यावर वरिष्ठ अधिकारी यांनी दाखल द्यावी.

   जैन यांना या विषयावर माहिती नाही. तरी नागरिकांच्या या होणाऱ्या समस्यांकडे लक्ष देऊन नागरिकांना न्याय देण्यास मदत करावी. या पाइपलाइनच्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अधिकाऱ्यांनी रहिवासीच्या या समस्यांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.अमृत योजनेची जबाबदारी जरी जैन यांच्याकडे आहेत तरी सर्व जिम्मेवारी इंजिनियर  यांच्यावर आहे पण ते आपल्या कामाकडे दुर्लक्ष करून आपल्या पदाचा दुरुपयोग करून रहिवासी ना परेशान करत आहे.