Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार विलास मोरे यांना प्रदान

Responsive Ad Here

  गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

    महाराष्ट्र शासनात तर्फे देण्यात येणाऱ्या स्व . यशवंतराव चव्हाण वाङ्मयय पुरस्कारातील बाल वाङ्मयातला  "बालकवी" पुरस्कार कवी विलास मोरे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सहा . अधिकारी अमोल शिरफुले यांनी कवी विलास मोरे यांचे निवासस्थानी येऊन सन्मानपूर्वक प्रदान केला . 

      या प्रसंगी "शाळेला सुट्टी लागली रे " या बाल कविता संग्रहाला मिळालेल्या या पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रक्कम रूपये ५० हजार मात्र प्रदान करण्यात आले .  या प्रसंगी बोलतांना कवी विलास मोरे यांनी राज्य शासनाचे प्रति कृतज्ञता व्यक्त करत आपल्या साहित्य प्रवासाविषयी मनोगत विषद केले .

      अमोल शिरफुले यांनी कवी विलास मोरे यांच्या साहित्याबद्दल मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या साहित्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  कवी डॉ . मिलींद बागुल, माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ महाजन, शालीक भाऊ गायकवाड, अँड . मोहन शुक्ला ,यांनी मनोगते व्यक्त केली . 

       कार्यक्रमाचे सुत्र संचलन अरूण माळी यांनी तर आभार युवराज माळी मानले .कार्यक्रमास  डीडीएसपी महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित दादा पाटील, विजय आण्णा महाजन, युवराज खोकरे, विनायक मोरे, प्रीती मोरे, विनोद पाटील, जयश्री मोरे इ . मान्यवर उपास्थित होते .