प्रदिप रघुते अमरावती
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे पाॅवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर शाखेच्या वतीने आज दि.20/20/2021रोजी विश्राम गृहामधे आचार्य कै,बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोचे पुजन करण्यात आले तसेच तालुका शाखेच्या वतीने उत्तमराव बाम्हणवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
पाॅवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचा नवनियुक्ती झालेले गोकुल खोडकेे तसेच तालुका शाखेतील पत्रकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमांचे संचालन तालुका सचिव सागर सव्वालाखे प्रास्ताविक उमेश चौखडे आणि आभार प्रदिप रघुते (येनस)यांनी मानले या कार्यक्रमाला पत्रकार श्री,शिवदास उईके,प्रमोद देशमुख,मनोज जैन,प्रशांत झोपाटे,अमोल दांडगे,अंकुश निमणेकर,इत्यादी पत्रकार मंडळी उपस्थित होते.
