मो.असलम परवेज : लोणार तालुका प्रतिनिधी
जागतिक कीर्तीचे "अ" दर्जा प्राप्त असलेले पर्यटन, लोणार सरोवराला आज ५ फेब्रुवारी २०२१ रोजी मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लोणार सरोवराचे संवर्धन आणि विकास कामाचा आढावा घेण्याकरिता येत आहे. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री आकस्मिकपणे लोणार येण्याचे कळताच लोणार करांना सुखद धक्का बसला आहे. सरोवराच्या संवर्धन आणि विकासाबाबत नवीन घोषणा होण्याची अपेक्षा मा. मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त केली जात आहे. असं असणार मा.मुख्यमंत्री महोदयांचे शुक्रवार, दिनांक ०५ फेब्रुवारी.२०२१ चे कार्यक्रमाचे वेळापत्रक सकाळी ०७.४५ वा.मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने सांताक्रूझकडे प्रयाण
०८.०० वा. छ.शि.म.आ.विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन
०८.०५ वा. विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
०८.५५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
०९.०० वा. हेलिकॉप्टरने लोणार, ता.लोणार, जि.बुलडाणाकडे प्रयाण
०९.३० वा. मोजा लोणार भाग १ हेलिपंड, ता.लोणार, जि.बुलडाणा येथे आगमन
०९.३५ वा. मोटारीने वन विभागाच्या विश्रामगृहाजवळील “सरोबर View Point (वनकुटी), लोणारकडे प्रयाण
०९.४५ वा. सरोबर View Point (वनकुटी), लोणार येथे आगमन व सरोवर पाहणी
०९.५५ वा. मोटारीने धारातीर्थ लोणारकडे प्रयाण
१०.०० वा. धारातीर्थ लोणार येथे आगमन व धारातीर्थ लोणार सरोवर परिसर पाहणी
१०.१० वा. मोटारीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृह, लोणारकडे प्रयाण
१०.१५ वा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृह, लोणार येथे आगमन
१०.१५ वा. लोणार सरोवर संवर्धन व विकासकामांबाबत सादरीकरण व बैठक
१०.४५ वा. राखीव
११.०० वा. मोटारीने मोजा लोणार भाग १ हेलिपंड, ता.लोणारकडे प्रयाण
११.१० वा. मोजा लोणार भाग र हेलिपैड येथे आगमन
११.१५ वा.हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण
११.४५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
११.५० वा. मोटारीने जिल्हा क्रिडा संकुल, चिकलठाणा, औरंगाबादकडे प्रयाण
१२.०० वा. जिल्हा क्रिडा संकुल, चिकलठाणा येथे आगमन
दुपारी १२.०० वा. जिल्हा क्रिडा संकुल, चिकलठाणा भूमिपूजन समारंभ
१२.१५ वा. मोटारीने दिल्ली गेटकडे प्रयाण
१२.३० वा. दिल्ली गेट येथे आगमन
१२.३० वा. औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनांतर्गत दिल्ली गेट जलकुंभाच्या कामाची पाहणी१२.४० वा. मोटारीने जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण
१२.४५ वा. जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे आगमन
१२.४५ वा. बैठकीसाठी राखीव
०१.४५ वा. मोटारीने औरंगाबाद विमानतळकडे प्रयाण
०१.५५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
०२.०० वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण
०२.५० वा. छ.शि.म.आं.विमानतळ, सांताक्रूझ, मुंबई येथे आगमन
०२.५५ वा.मोटारीने मातोश्री निवासस्थानकडे प्रयाण
०३.१० वा.मातोश्री निवासस्थान येथे आगमन
अचानक दौऱ्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. पोलीस प्रशासन, नगर प्रशासन आणि महसूल प्रशासनाने मुख्यमंत्र्यांचे आगमनाचे युद्धपातळीवर तयारी केली आहे. आता मा. मुख्यमंत्री आणि मा.पर्यावरण मंत्री लोणारच्या विकासासाठी काय घोषणा करणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
