प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद - शहरामध्ये आजपासून म्हणजे 23 फेब्रुवारी ते 14 मार्च पर्यंत संचारबंदी असेल असा निर्णय जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त मनपा आयुक्त यांच्या बैठकीत झाला आहे.
या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू उद्योग कर्मचारी यांना संचारबंदी मधून वगळण्यात आलेले आहे पुढील टप्प्यामध्ये आठवडी बाजार आणि भाजीमंडई याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
जिल्ह्यात सोमवारी 132 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे तर 111 जण कोरोना मुक्त झालेले आहेत एक जणांचा मृत्यू झालेला आहे. सर्वाधिक रुग्ण मनपा हद्दीत वाढत आहेत असे दिसून येत आहे.
