Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथे युवतीसेनेच्या मुलाखती संपन्न

Responsive Ad Here

  गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल

   शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून व युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात युवतींचे संघटन उभे राहावे, त्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी युवतीसेनेच्या पदाधिकारी नियुक्तीसाठी एरंडोल येथील शासकीय विश्रामगृहात युवासेनेच्या कोअर कमिटीच्या सदस्या तथा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ.शितलताई देवरुखकर-शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखतींचे आयोजन करण्यात आले.

      यावेळी त्यांनी उपस्थित युवतींशी संवाद साधताना युवतींचे शिक्षण,आरोग्य व रोजगार या विषयीचे प्रश्न, महिलांचे समाजातील स्थान व सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले. जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा पाटील यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मतदार संघात महिला व युवतींसाठी बचतगटाचे मोठे जाळे निर्माण करून त्यातून रोजगार उपलब्ध करून देण्याविषयीची माहिती दिली. तसेच मतदार संघात युवासेनेच्या राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी सुमारे 50 युवतींनी मुलाखतीसाठी सहभाग नोंदविला.

   यावेळी युवासेनेचे विस्तारक कुणाल दराडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, धरणगावच्या माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, पाचोऱ्याच्या माजी नगराध्यक्षा सुनिताताई पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,नगरसेविका आरती महाजन, एरंडोल महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रतिभा पाटील,पारोळा महिला आघाडी तालुकाप्रमुख उर्मिला भोसले, उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी,शिवसेनेचे शहर प्रमुख कुणाल महाजन, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, आनंदा चौधरी, छोटू मराठे आदी उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेनेचे शहरप्रमुख अतुल भाऊ महाजन यांनी केले तर आभार तालुकाप्रमुख बबलू पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवासेनेचे तालुका समन्वयक कमलेश पाटील, शहर समन्वयक अमोल भावसार, परेश बिर्ला, देवेन पाटील, मयूर महाजन, कृष्णा ओतारी यांनी सहकार्य केले.