प्रदिप रघुते अमरावती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा ,विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नुकतीच अभ्यास मंडळाची स्थापन करण्यात आली. शैक्षणिक सत्र 2021-22 करिता नुकतीच सभा संपनं झाली. या सभेच्या अध्यक्ष स्थानी प्रा.डॉ.मुळे सर (विभागप्रमुख.)होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागातील सर्व प्रा. वर्ग उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष -डॉ.भीमराव वाघमारे सर
प्रमुख मार्गदर्शक :- डॉ. वामन गवई सर, डॉ.पि.एस. खडसे सर , डॉ.प्रा.पवन तायडे सर, प्रा.धम्मदीप गवई सर, प्रा.सुरेश पवार सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मल काळबांडे यांनी तर प्रास्ताविक बी.जे.डोंगरे यांनी केले व आभार प्रदर्शन मिलिंद वाहुरवाघ यांनी केले. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष या दोन्ही वर्गातून अभ्यास मंडळाच्या खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष:-बी.जे. डोंगरे , उपाध्यक्ष:-सतीश काळबांडे
सचिव :-निर्मल काळबांडे सहसचिव:-दादाराव रुपणारायण
कोषध्यक्ष:-मिलिंद वाऊरर वाघ सहकोशाध्यक्ष:-रत्नशील खोब्रागडे
सदस्य:- एन. बी. माटे, हरिदास भालेकर, कुंदा सोनुले, नितीन मोडके यांची निवड करण्यात आली .तर इतर समित्या मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे निवड करण्यात आली.
सहल समिती:- सुनंदा ढवळे, चंद्रसेन जंवजाळ
प्रसिद्धी समिती:- सुरज मंडे ,वैशाली शेंडे
कार्यक्रम समिती:- अश्वजित वानखेडे, संध्या गणवीर.
सेमिनार समिती:- सुनीता वानखेडे, रवींद्र गजभे.या प्रसंगी सर्व प्रमुख वक्त्यांनी आपापले विचार व्यक्त केले.डॉ. प्रा. पवन तायडे सरांनी अतिशय नियोजन बद्धपद्धतीने व कमी वेळात पदाधिकारी निवडीचे सोपस्कार पार पाडले. या प्रसंगी विभागप्रमुख सह सर्व प्राध्यापक वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा (विभाग एम. ए.) भाग एक व दोन चे बहुसंख्य विद्यार्थी यांनी ऑनलाईन हजेरी लावली. असे प्रशिद्धी प्रमुख सूरज मंडे यांनी कळविले आहे.