गणेश पांढरे जामनेर प्रतिनिधी
जामनेर विधानसभा शिवसेना महिला आघाडीतर्फे पेट्रोल -डिझेल दरवाढ विरोधात जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील नगरपालिका कार्यालयापासुन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील युवासेना जिल्हा उपप्रमुख विश्वजीत पाटील निळकंठ पाटील भरत पवार सुकलाल बारी रवींद्र पांढरे शहर प्रमुख अतुल सोनवणे ज्ञानेश्वर जंजाळ सुधाकर शेठ सराफ शामराव पाटील रामचंद्र रोडिया दिपक माळी सुमित चव्हाण पवन माळी रमेश लिंगायत भाऊराव गोंधनखेडे महिला आघाडीच्या मीनाताई शिंदे पंढरी शिंदे शिवा पवार यांच्यासह शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शहरातील नगरपालिका कार्यालयापासुन शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध नोंदवित तहसिलदार कार्यालयात येऊन तहसिलदार अरुण शेवाळे यांना जाहिर निषेधाचे निवेदन दिले. कारोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी - धंदयावर गदा आला, रोजगार बुडाले, संसार कसा चालवावा असा यक्ष प्रश्न ? जनताजनार्दनास पडला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन सतत पेट्रोल - डिझेल दरवाढ सुरुच आहे. यामुळे प्रचंड महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसाला कस जगाव कि मराव, अशी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. पेट्रोल - डिझेल दरवाढीने शंभरी गाठलेली आहे. त्यामुळे दळणवळण महागले. प्रचंड प्रमाणावर महागाई वाढली, जनतेला स्वस्त, मुबलक जिवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र भाजपा प्रणीत मोदी सरकारची निती ही भांडवलदारांची आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही घेणे नाही. जनता मात्र महागाईच्या वजनात होरपळून निघत आहे. हे शिवसेना कदापी सहन करत नाही. शिवसेना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी राहील. मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार, पेट्रोल डिझेल दरवाढ तातडीने मागे घ्यावी. महागाईला आळा घालावा, अन्यथा जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे ही यावेळी सुकलाल बारी दिपक माळी अतुल सोनवणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील विश्वजीत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
