Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत बुलडाणा अँथलेटिक्स क्लब बुलडाणा च्या चार खेळाडूंनी मिळविले यश

Responsive Ad Here

देवानंद नेमाने  तालुका प्रतिनिधी

    स्ट्रायडर्स राज्यस्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल फुलगाव  पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती.या स्पर्ध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यातील ३२ जिल्ह्यांच्या ६०० पेक्षा जास्त खेळाडूंचा समावेश होता..या मध्ये २०० पेक्षा जास्त मुलींचा  तसेच ४०० पेक्षा जास्त मुलांचा सहभाग होता. 

     पुरुष गटातील नाशिक संघाने विजेतेपद ,सातारा संघाने उपविजेतेपद मिळवले. महिला गटामध्ये विजेतेपद नागपूर संघाला ,उपविजेतेपद पुणे संघाला तसेच तृतीय जेतेपद बुलढाणा संघाला मिळाले . बुलढाणा जिल्ह्याला मिळालेल्या तृतीय जेतेपद (चॅम्पियनशिप) मधील सर्व खेळाडू हे बुलडाणा अॅळथलेटिक्स क्लब बुलडाणा  या क्लब चे असून त्यांची नवे १) पूनम राजेंद्र सोनोने २)पूजा मारोती निबूडे ३)अश्रवंती प्रल्हाद केदार व ४)पूजा अनिल सीताफळे हे आहेत,हे सर्व खेळाडू आपल्या यशाचे सर्व श्रेय खेळाडू त्यांचे आई वडील ,बुलडाणा अॅ थलेटिक्स क्लब बुलडाणा चे सर्वेसर्वो समाधान टेकाळे तसेच बुलढाणा अॅरथलेटिक्स असोसिएशन चे सचिव गोपालसिंग राजपूत यांना ते देतात 

    स्ट्रायडर्स राज्यस्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा २०२१ स्पर्ध्येतुन महाराष्ट्र संघाची निवड हि २१ फेब्रुवारी २०२१ रोजी चंदिगढ पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा २०२१ साठी होणार आहे . राज्यस्तरीय स्पर्ध्येच्या उदघाटन प्रसंगाच्या वेळी महाराष्ट्र राज्य अॅिथलेटिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष अभय छाजेड ,महाराष्ट्र अॅ्थलेटिक्स असोसिएशन चे सचिव सतीश उचिल ,लोकसेवा प्रतिष्टान चे अध्यक्ष दीपक पायगुडे,तांत्रिक पंच बॅप्टिस डिसुझा ,चंद्रकांत पाटील ,विजय बेंगळे,आंतराष्ट्रीय पंच किशोर शिंदे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या गुरुबंस कौर, यांच्या हस्ते स्पर्ध्येचे उदघाटन करण्यात आले