Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड यांना हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या वतीने शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविण्याबाबत निवेदन.

Responsive Ad Here

मो.असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधी

   लोणार: हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन च्या वतीने मुंबईत शिक्षणमंत्री ना. वर्षा ताई गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन प्रथम त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या परंपरा नुसार पुस्तक शाल व एक शानदार मोमेंटो देऊन जंगी सत्कार करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आली आणि चर्चा करून एक निवेदन सादर केले व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याची विनंती केली व एक प्रत शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त शिक्षण सचिव वंदना कृष्ण मॅम यांना ही सादर करण्यात आले.


निवेदनामध्ये खालील मागण्यांचा समावेश होता.

१) अघोषित शाळांना घोषित करून प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे.

(२) राज्यातील २०% मंजूर शाळांना प्रचलित नियमानुसार १००% अनुदान देण्यात यावे.

 (३) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी.

 (४) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू करण्यात यावी.

(५)  शिक्षण सेवक मानधन मध्ये तातडीने वाढ करण्यात यावी.

         तसेच आजाद मैदानात शिक्षक समनव्य संघ तर्फे बेमुदत आमरण उपोषण सुरू याकळे ही त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर शिक्षकांच्या प्रलंबित मांगण्या मंजूर करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. शिष्टमंडळात हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, शाहरुख पठाण, शफीक पठाण, शेख वसीम, शेख जफर आदींचा समावेश होता.