Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर येथे पुलवामा भ्याड हल्ल्यात शहिद जवानांना श्रद्धांजली करून सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे जामनेर प्रतिनिधी

     जामनेर येथे आज दिनांक 14 फेब्रुवारी पुलवामा भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले व दोन मिनिट मोन करण्यात आले त्यानंतर हवलदार डी.डी.अहिरे (माजी सैनिक) सैन्यातून 24 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार माजी मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला व महाराष्ट्र रक्षक सेनेचे तालुकाप्रमुख काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) यांच्या हस्ते व रक्षक सेनेचे कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सुद्धा सत्कार करण्यात आला.

     त्यानंतर त्यांना महाराष्ट्र रक्षक सेना तालुका खजिनदार पदी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित तालुकाप्रमुख काशिनाथ शिंदे व उपतालुकाप्रमुख शिवाजी वाघ तालुका सचिव ईश्वर मावरे.तालुका सल्लागार सुमित चव्हाण तालुका संघटक विनोद नाईक तालुका संपर्कप्रमुख लालचंद चव्हाण तालुका कार्याध्यक्ष पवन माळी महिला तालुकाप्रमुख मीना शिंदे .महिला उपतालुकाप्रमुख दर्शना पाटील. पहुर शहर प्रमुख पंडित पाटील. नेरी शहरप्रमुख रिजवान मनियार. आदी महाराष्ट्र रक्षक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.