Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भारतीय सैन्य दलात मातृभूमीची १७ वर्षे सेवा करून समाधान पाटील सेवानिवृत्त

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

        भारतीय सैन्यदलात १७ वर्ष प्रदिर्घ सेवा करुन समाधन पाटील सेवानिवृत्त झाले. घराची आर्थिक परिस्थिती चांगली असतांना सुध्दा लहानपणीच काकां कडून प्रेरणा घेऊन व देशसेवा करण्याची जिद्द बाळगून समाधान पाटील हे २००४ साली सैन्य दलात दाखल झाले.त्यांनी हिमाचल प्रदेश,जम्मू काश्मीर सह देशातील अनेक भागात सेवा बजावून देशाची १७ वर्ष सेवा केली.शेवटी सिक्किम चायना तसेच भूतान बॉर्डरवर सेवेत असतांना सेवानिवृत्त झाले.

      जवान समाधान पाटील हे सेवानिवृत्त झाल्या मुळे त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील होते.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी उपनगराध्यक्ष शालिक गायकवाड, उपनगराध्यक्ष अभिजीत  पाटील,नगरसेवक योगेश महाजन ,सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी,राजेंद्र महाजन,अनुदानित आश्रमशाळा बोरगाव चे  चेअरमन विलास भाऊ सोनवणे ,मुख्याध्यापक ठाकरे सर ,तुळशिराम पाटील, जिजाबाई पाटील ,मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सुदाम भदाणे सर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमा ची सांगता झाली.