गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल पोलीस स्टेशन व नगरपालिकेतर्फे मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून सोळा हजार रुपये दड वसूल केला आहे . कोरोना ने पुन्हा जिल्ह्यात प्रवेश केलेला असून मोठ्या प्रमाणात कोरूना चे रुग्ण मिळत असल्याने जिल्हाधिकारी सो. जळगाव यांच्या आदेशाने एरंडोल पोलीस स्टेशन व नगरपालिका यांनी सामुहिक कारवाई करून लग्न समारंभाच्या ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणाहून जमलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली त्यातून सोळा हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे लग्न समारंभाच्या ठिकाणी तीन ठिकाणी नगरपालिका कर्मचारी व पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर धडक मोहीम राबवून मार्क्सचा वापरणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.
एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे मुख्याधिकारी किरण देशमुख विलास पाटील विकास खैरनार संतोष चौधरी या पोलिस कर्मचाऱ्यांसह विनोद पाटील एस आर ठाकूर राहुल ठाकूर या पथकाने कारवाई केली आहे तरी व्यापारी व नागरिकांनी कटू प्रसंग टाळण्यासाठी कोरूना संदर्भात शासनाने आदेशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी किरण देशमुख पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे.
