Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल स्पर्धेत चिखली च्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी


    चिखली अँम्युचर फेडरेशन आँफ रोलर बास्केटबॉल व पंजाब रोलर बास्केटबॉल असोसिएशन इंडिया यांच्या वतीने २६ ते २९ जानेवारी दरम्यान डि.ए.व्ही.सिनीयर सेंकंडरी स्कूल सेक्टर आठ चंदिगढ येथे घेण्यात आल्या.या मध्ये महाराष्ट्र चा संघ सहभागी झाला होता. महाराष्ट्र संघामध्ये चिखली येथील १४ वर्षे वयोगटातील अथर्व महाडिक  (कर्णधार) महाराष्ट्र टिम स्वरुप डहाके ,लोकेश कोठारी, हे तिन खेळाडू व राष्ट्रीय पंच म्हणून देवानंद नेमाने, (बुलढाणा) लायक सय्यद (लातूर) सय्यद निसार (जालना) यांची निवड झाली होती.


     १४ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्या पर्यंत मजल मारली अंतिम सामन्यात राजस्थान संघाने उत्कृष्ट कामगिरी करत (२-१) गोल करत विजेता पदावर मजल मारली तर महाराष्ट्र संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले महाराष्ट्र संघाने सिल्व्हर मेडल मिळविले याचे श्रेय खेळाडूंनी बुलढाणा जिल्हा रोलर बास्केटबॉल असोसिएशन चे सचिव देवानंद नेमाने, अध्यक्ष शंतनु भाऊ बोंद्रे, व आई वडिल व मार्गदर्शक यांना दिले. चिखली च्या खेळाडूंचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहेत.खेळाडूंना माधव मंडळकर,अध्यक्ष रोलबाँल असोसिएशन बुलढाणा  कुणाल भाऊ बोंद्रे, नगराध्यक्ष चिखली, नामु गुरुदासानी नगरसेवक चिखली विजय पळसकर सर बंटी लोखंडे, सुनिल ठेंग,ज्ञानेश्वर जाधव, संदिप बिथरे, पुरूषोत्तम कापसे यांनी खेळाडूंचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.