Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील २० पुलांसाठी ३४ कोटींच्या कामांना मान्यता

Responsive Ad Here


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २; रस्ते विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर: ना. गुलाबराव पाटील


जळगाव प्रतिनिधी गणेश पांढरे


  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी ३४ कोटी रुपयांच्या कामांना  नुकतीच प्रशासकीय मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. हे पूल चार विधानसभा मतदारसंघांमध्ये तयार करण्यात येणार आहेत.

     मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी   ३४ कोटी रुपयांच्या कामांना  नुकतीच प्रशासकीय मान्यता शासनाच्या ग्राम विकास  विभागामार्फत देण्यात आली आहे. संबंधीत आमदारांनी याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ना. पाटील यांनी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने या कामांना मंजुरी मिळाली आहे.

      यात धरणगाव तालुक्यातील धार ते चोरगाव या रस्त्यावर ३  पुलांच्या कामांसाठी ३ कोटी ४१ लक्ष, पथराड - वंजारी खपाट ते बोरखेडा रस्त्यावर १ कोटी ४८ लक्ष  तसेच जळगाव तालुक्यातील हायवे  ते तरसोद रस्त्यावर १ कोटी २८ लक्ष व बिलखेडा ते बिलवाडी या रस्त्यावर १ कोटी ३५ लक्ष  असे एकूण जळगाव ग्रामीण मध्ये ६ पुलांच्या कामासाठी ७ कोटी ४२  लक्षच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. 


     यासोबत जामनेर तालुक्यातील स्टेय हायवे ४२ ते सावखेडा; एमडीआर २९ ते शेळगाव,चिंचखेडा ते वाकडी; स्टेट हायवे ४६ ते गोद्री रस्त्यावर ६ पुलांच्या कामांसाठी १६ कोटी निधी मिळणार आहे.  चोपडा तालुक्यातील  मालखेडा शेंदाणी रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी ३३ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय, पाचोरा तालुक्यातील लोहटार गाळण चिंचोले नगरदेवळा खाजोळा सारवे बु. रस्त्यावर १ पुलाच्या कामांसाठी २ कोटी २१ लक्ष; यावल तालुक्यातील सातोद - कोळवद - असारबारी रस्त्यावर  २ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी १९ लक्ष , रावेर तालुक्यातील भोर - पुनखेडा - पातोंडी - धुरखेडा रस्त्यावर १ पुलाच्या कामांसाठी ४ कोटी १३ लक्ष मिळणार आहेत. तर, बोदवड तालुक्यातील शेलवड -  वाकी रस्त्यावर १ पुलाच्या कामासाठी  १ कोटी ६ लक्ष निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

     दरम्यान, या संदर्भात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, रस्ते मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन  वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते हे फक्त दळण - वळणासाठी नाही तर जनतेचे  आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.  पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून रस्ते विकासामुळे गावा - गावा पर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहचतो.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत  जिल्ह्यात महामार्गासारखे दर्जेदार रस्ते व पूल  करण्यासाठी  जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने २० पुलांसाठी तब्बल ३४ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे  ना. गुलाबराव पाटील म्हणाले.