Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यातील 3 दिवसकडकडीत ' जनता कर्फ्यू ' लागू

Responsive Ad Here

गणेश पांढरे जामनेर  प्रतिनिधी 

   जामनेर तालुक्यातील कोरोना विषाणू संक्रमानाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पहूर मध्ये   शनिवार , रविवार , सोमवार असे तीन दिवस ( दि. १ ३ मार्च ते १५ मार्च )  कडकडीत ' जनता कर्फ्यू ' लागू करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला . यावेळी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ सभेच्या अध्यक्षस्थानी होते .यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा ,माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे ,  डॉ . भारती ए .लेले , डॉ . अनिकेत लेले , डॉ . रवींद्र बडगुजर , डॉ . प्रशांत पांढरे , डॉ . जितेंद्र वानखेडे , डॉ . जितेंद्र घोंगडे , डॉ .  रमेश पाटील , माजी जि.प .सदस्य राजधर पांढरे ,  , शैलेश पाटील ,  आदींनी मनोगत व्यक्त केले .

काय राहणार चालू 

     तीन दिवसीय लॉकडाउन काळात मेडिकल , दवाखाना आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरु राहणार आहे . या व्यतिरिक्त सर्व प्रतिष्ठाने बंद राहतील . बंद काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सांगितले .या बैठकीत शिवसेना नेते गणेश पांढरे माजी सरपंच लक्ष्मण गोरे शंकर जाधव विनोद थोरात  शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव  माजी उपसरपंच ईकारान्त पैलवान भारत पाटील किरण खैरनार सर्वपक्षीय पदाधिकारी पत्रकार व्यापारी उपस्थित होते .यावेळी कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करण्यात आले .