Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सावरगावतळ येथील जंगलाला लागलेला भीषण वणवा युवक व महिलांच्या प्रयत्नाने आटोक्यात

Responsive Ad Here

नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे

     संगमनेर:- तालुक्यातील सावरगावतळ येथील मोहिमाळ परिसरातील जंगलाला रविवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेला वणवा युवक व महिलांच्या शर्थीचे प्रयत्नातुन मोठी वनसंपदा वाचविण्यास यश मिळाले आहे.

        सावरगावतळ गावास खूप मोठी वनसंपदा लाभली असून जवळपास आठशे हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावर येथे दाट जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे झाडे झुडपे याचबरोबर अनेक दुर्मिळ वनौषधी वनस्पती असून   जंगली प्राणी,पशु पक्षी ,श्वापदे यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.  गावकरी आणि वनविभाग येथे सातत्याने वृक्षारोपण करत आपली वनसंपदा अधिक संपन्न करण्याच्या प्रयत्न करत आहे

        परंतु रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानकपणे येथील वनक्षेत्रावरील काही भागातील जंगलाला अचानकपणे मोठा वणवा लागला. ह्या वनव्याने पाहता पाहता मोठे उग्र रूप धारण केले होते. या आगीची, वनव्याची माहिती गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना कळताच पोलीस पाटील नेहे यांनी जंगलाला लागलेल्या वनव्याची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकारी  यांना कळवून ते मदतीसाठी येण्याची वाट न पाहता पोलीस पाटील यांनी गावातील वनसंपदेवर आलेले हे आरिष्ट समजून गावातील युवकांना वणवा  विझविण्यासाठी मदतीचे आवाहन करताच गावातील  युवक, शालेय विद्यार्थी,महिला असे शंभर जण वणवा विझविण्यासाठी वनव्याच्या दिशेने धावले.


        पोलीस पाटील गोरक्ष नेहे वनपाल रामदास डोंगरे, , वनरक्षक चैतन्य कासार, वनरक्षक एकनाथ राहणे  शिपाई पुनाजी मेंगाळ यांची टीमही घटनास्थळी मदतीसाठी पोहचली.

         दुपारीच्या वेळेत ही आग लागल्याने आणि त्यात जोराची हवा व ऊन यामुळे हा वणवा आटोक्यात आणणे खूप अवघड होत होते. परंतु गावातील या सर्व शंभर तरुणांनी,महिलांनी आणि वन अधिकारी कर्मचारी यांनी एक तासास हा वणवा पूर्णपणे आटोक्यात आणल्याने जवळपास दोन हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदा जरी जळून गेली असली तरी उर्वरित  वनसंपदेवरील मोठे आरिष्ठ टळले गेले.