जिल्हा प्रतिनिधी उमेश कोळी
रावेर पंचायत समितीच्या सभापती सौ कविता हरलाल कोळी यांनी अनोखा फंडा सुरू केला आहे.जनतेत कोविड लसीकरणाची जागृती करून जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा . यासाठी प्रचार करणार असुन सदर ची माहिती देण्यासाठी पंचायत समिती सभापती सौ कविता
कोळी ह्या "आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत गावागावात जावून लसीचे महत्व पटवून देत भेटी देणार आहे. प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याचे आवाहन सभापती कविता कोळी यांनी केले आहे.
