Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे कविवर्य विलास मोरे यांचा सत्कार व मेडिकल असोसिएशन आणि एरंडोल तालुका पत्रकार संघटना यांच्या तर्फे मोफत मास्क वाटप कार्यक्रम

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

     एरंडोल: येथील ख्यातनाम साहित्यिक कविवर्य विलास मोरे यांना महाराष्ट्र शासनातर्फे बालकवी पुरस्कार प्रधान करण्यात आला. त्याबद्दल एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे विलास मोरे यांचा १५ मार्च २२ रोजी सत्कार करण्यात आला, आडगाव येथील पत्रकार प्रल्हाद पाटील याचा ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान या वेळी करण्यात आला  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील होते.

       " धरती बेच देंगे,  गगन बेच  देंगे, चमन बेच देंगे ,अमन भेज देंगे,अगर सोते रहे कलम के पुजारी तो दौलत के पुजारी वतन बेच देंगे.".  असा शेर कविवर्य विलास मोरे यांनी सादर करून पत्रकार यांच्या भूमिकेचे महत्व विशद केले. तसेच पत्रकार हा समाजाचा जागल्या असल्यामुळे त्यांची जबाबदारी फार मोठी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

            प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शैलेश चौधरी यांनी केले. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बी एस चौधरी यांनी केले, यावेळी प्रा. सुधीर शिरसाट, कमर अली सय्यद, कैलास महाजन, प्रल्हाद पाटील, यांची समायोचित भाषणे झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील कैलास न्याती त्यांनी केले. आभार प्रदर्शन संजय बागड व दिनेश चव्हाण त्यांनी केले. याप्रसंगी पंकज महाजन, दीपक बाविस्कर,  प्रवीण महाजन, कुंदन ठाकूर, चंद्रभान पाटील, देविदास सोनवणे, रतन अडकमोल, मनोहर ठाकूर, रोहिदास पाटील,उमेश महाजन, किशोर भक्कड, भुषण पाटील, मनोहर पाटील, महेश पाटील, पिंटू सोनार, उदय पाटील, अजय महाजन, अजय वाघ , भिला पाटील आदी उपस्थित होते. कविवर्य विलास मोरे यांचा सत्कार करताना प्रमोद पाटील, बी.एस. चौधरी, चंद्रभान पाटील, कैलास महाजन , किशोर भक्कड, प्रल्हाद पाटील, कमर अली सय्यद शैलेश चौधरी दिसत आहे.