प्रदिप रघुते येनस.
नांदगाव खंडेश्वर मध्ये काही गावामध्ये ढगफुटी झाल्याने नाले नद्या असललेल्या शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले होते.जुन जुलै मधील पेरण्या ह्या (शेतकऱ्यासाठी फार महत्वाच्या असतात,सोयाबिन तुर आणि पाढरी चादी म्हणजेच पराटी अशे पिक नादगांव तहसिल अतंर्गत बर्याच शेतकऱ्यांच्या शेतात हा पेरा सर्वात जास्त प्रमानात असतात आणि ह्या पिकावर मुलाचे शिक्षण घर चालवणे.जिवणावश्यक सर्वच गोष्टी अवलंबुन असताना .जर भरपुर पाऊसा अभावी येणारे पिक हे जमिणदोस्त झाले.
हि वस्तुस्थिती पहाण्यास तहसिलदार ,तसेच कुषी अधिकारी,लोकप्रतिनिधी माजी आमदार.तलाठी यानी नाल्यातुन येणारा पाऊस हा शेतकरी यांच्या शेतात पहाला आणि कोणाचे किती नुकसान झाले हे सुध्दा नजरे समोर असतांना ज्यांच्या शेताची पहाणी केली तेच बिचारे शेतकरी वंचित आहे.
कोरोना सारख्या महामारीत जिवन जगणे कठीन झाले आहे. तेव्हा आपले जिवन जगणे सुकर व्हावे आणि मागेपुढे का होईणा नुकसान भरपाईचे पैशे शासणा कडुण भेटण या आशेवर बिचारे नादगाव खंडेश्वर तालुक्यातील कोहळा जेठेश्वर येथिल मारुती नेवारे,शेत सर्वे नं.157 श्रेत्र4 एक्करात पुर गेल्याने धरती मातेच्या पोटी उगवलेले पिक पुर्णच खरडुण गेले असता असे बरेच शेतकरी व त्याच गावातील रहिवाशी प्रकाश वाघमारे,सरला वाघमारे प्रगती लवंगे.पजांबराव वाघमारे ,रामकुष्ण वाघमारे व इतर शेतकरी हे पात्र असुन सुद्धा वेगळ्या) असल्याने पुन्हा नुकसाण भरपाई साठी पात्र राहण्यासाठी,लेखी अर्ज दि.22/12/2020ला सुद्धा तहसिल कार्यालय नादगाव खंडेश्वर येथे केले आहे .
अधिकारी आले सत्यवस्तुस्थिती पाहुण गेले.पण पाणि कुठं मरले हे माहीत नाही तेव्हा प्रकाश वाघमारे यांनी आम्ही पात्र असुण आम्हाला नुकसान भरपाईचे पैशे न (मिळाल्यास )आम्ही उपोषणाला बसल्याशिवाय राहु नये असेही ते म्हणाले.
