नाशिक येवला प्रतिनिधी @माधव नेहे
मार्च महिन्याच्या सुरुवातीला ेवला तालुक्यात उन्हाळ्याचे चटके चालू लागले आहेत याच नायगाव येथील गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी मधून नियोजनशून्य ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दिनांक ५ मार्च रोजी व त्या आधी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याची तक्रार अंबिका माता मित्र मंडळाच्या वतीने
करण्यात आली. असून मंडळाचे अध्यक्ष पंकज सदगीर यांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज हजारो लिटर पाणी या जलपुरवठा करणाऱ्या टाकीमधून वाया जात असून संबंधित ग्रामसेवक व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे तसेच संबंधित ग्रामसेवक यांचे गावात दर्शन दुर्लभ असून पाणीपुरवठा वर नियंत्रण राहात नाही दरम्यान यासंदर्भात लवकरच नायगव्हाण ग्रामपंचायतीस निवेदन देण्यात येणार असून निवेदनाची दखल घेतल्यास व पाणी गळती न थांबविण्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील अंबिका माता मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.
