Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री याचे निर्देश

Responsive Ad Here

गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव

    जळगाव - शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला असून काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या आपत्तीत नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. याबाबत वृत्त असे की, शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी जलधारा कोसळल्या. तर चाळीसगाव तालुक्यासह काही तालुक्याच्या ठिकाणी तुफान गारपीट झाली. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

File photo

     अनेक ठिकाणी पिके आडवी पडल्याने शेतकर्‍यांची जबर हानी झाली आहे.दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या नुकसानीची तातडीने दखल घेतली असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावेत असेही ना. गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिले आहेत. परिणामी, कृषी व महसूल खात्यातर्फे तात्काळ कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.