उमेश कोळी प्रतिनिधी रावेर
आघाडी सरकारच्या काळात विकास कामे ठप्प झाले आहे.आघाडी सरकारच्या खंडणी वसुली करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. या भ्रष्ट मंत्र्याची हकालपट्टी करावी. या मागणी साठी रावेर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे नायब तहसिलदार विठोबा पाटिल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसिल कचेरीच्या आवारात जोरदार घोषणाबाजी देवून भ्रष्ट शासनाचा निषेध केला .
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन , तालुकाध्यक्ष राजन लासुरकर , सरचिटणिस महेश चौधरी , महेश चौधरी , तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे , जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल पाटिल , शहराध्यक्ष दिलीप पाटिल , प स सदस्य योगिता वानखेडे , जुम्मा तडवी , हरलाल कोळी , संदिप साळवे , मनोज श्रावग, तालुका युवा अध्यक्ष महेंद्र पाटिल , रविंद्र पाटिल, शुभम पाटिल , यासह भाजपा कार्यकर्ते यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा . तसेच आघाडी सरकार विरोधात आंदोलन करून निषेध केला. व रावेर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
