प्रतिनिधी येनस
कंजारा शहापूर येनस पहाडाला आग लागल्यामुळे पहाडाला लागून असलेल्या शेताकडे आगीचे उग्र रूप धारण करून वनवा पेटला होता त्यामध्ये शेतकऱ्यांचे गहू हरभरा यांचे पिकाला आग लागण्याचे दाट शक्यता झाली होती त्याच वेळी श्री राजू माहुरे कंजारा यांनी डॉ गजानन बाबुळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आगीबाबत ची माहिती दिली त्या क्षणी बाभुळकर यांनी पोलीस पाटील माधुरी बाबुळकर यांना माहिती दिली पोलीस पाटलांनी घटनेची माहिती पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर अग्निशामक दल चांदुर रेल्वे यांच्याशी संपर्क साधला तसेच माननीय आमदार प्रताप दादा अडसड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची इत्यंभूत माहिती देण्यात आली आमदारांनी वेळीच दखल घेऊन एम एस ई बी शी संपर्क साधून लोडशेडिंगचा बंद असलेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याबाबत चे आदेश श्री शिंदे साहेब श्री तायडे साहेब यांना दिले एम एस सी बी ने विद्युत पुरवठा सुरू केला .
![]() |
| file photo |
तसेच अग्निशामक दलाची गाडी अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये चांदुर रेल्वे वरून कंजारा येथे दाखल झाली गाडीतील कर्मचारी अमोल कडू ड्रायव्हर मयुरेश्वर अविनाश भाऊ यादव फायरमॅ न यांच्या मदतीला प्रफुल माळोदे योगेश भाऊ बाबुळकर गोलू इंगोले कटक तलवारे यश मोरे वासुदेव मोरे गौरव घेवारे तसेच इतर गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला पिके गहू हरभरा आगीपासून वाचला गावकऱ्यांनी माननीय आमदार प्रताप दादा चे इतर सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
