Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदुरा शहर व तालुकाभाजपा महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

      वृक्षारोपण, महिला सशक्तिकरण व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विधात्याने घडवलेली सृजनांची सावली म्हणजे स्त्री. आदिशक्ती, प्रभूची भक्ती, झाशीची राणी, मावळ्यांची भवानी, प्रयत्नांना लाभलेली उन्नती, आजच्या युगाची प्रगती म्हणजेच स्त्री. या स्त्रीशक्तिच्या हक्कांचे रक्षण व स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नांदुरा शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने सोमवार दि.


        ०८/०३/२०२१ रोजी  जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने *वृक्षारोपण, महिला सशक्तिकरण व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आदी विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नांदुरा शहरातील राजेंद्रजी डांगे यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा नामदार श्री चैनसुख संचेती तर प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उज्वलाताई संचेती तथा मार्गदर्शक म्हणून कोठारी महाविद्यालयातील शिक्षिका प्रा. प्रतिभाताई भोपळे आदी उपस्थित होत्या.   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री चैनसुखजी संचेती तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन वृक्ष संवर्धनाचे महत्व प्रतिपादीत करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित  प्रा. प्रतिभाताई भोपळे यांनी उपस्थित महिलांना 'महिला सशक्तिकरण' या विषयावर दिशादिग्दर्शन केले.

                   यावेळी महिला दिनाच्या अनुषंगाने शहरातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्यांचा गौरव म्हणून नांदुरा येथील झांबड विद्यानिकेतनच्या संचालिका श्रीमती मीना प्रेमचंदजी झांबड यांना सन २०२० चा भारत शिक्षा रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच भाजपा महिला आघाडी *शहराध्यक्षा सौ. सारिका राजेशजी डागा यांना दिव्या फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय नारीशक्ती एकात्मता पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. श्री चैनसुखजी संचेती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या भरीव कार्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक व कलात्मक, मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.

        सदर कार्यक्रमाचे आयोजन हे भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. अर्चना शिवाजीराव पाटील व *शहराध्यक्षा सौ. सारिका राजेशजी डागा यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनातून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नांदुरा शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, परिसरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जेष्ठ व अन्य महिला, गृहिणी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होत्या. यावेळी  सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन*करण्यात आले.