Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गिरीशभाऊ इन ॲक्शन पालकमंत्र्यांच्या भूमिकेत झाडाझडती

Responsive Ad Here

    जळगाव प्रतिनिधी

    माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर थेट आज जिल्ह्याच्या वैद्यकीय यंत्रणेची झाडाझडती घेऊन जिल्हा प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली. गिरीशभाऊंची ही धडाकेबाज अ‍ॅक्शन त्यांच्या पालकमंत्रीपदाची आठवण करून देणारी ठरली असून आज भाऊ याच भूमिकेत दिसून आले.

    माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाने ग्रासले होते. अन्य नेत्यांप्रमाणे ते देखील सहजपणे खासगी रूग्णालयात दाखल होऊ शकले असते. मात्र असे न करता त्यांनी मुंबईतील सरकारी रूग्णालयात उपचार घेतले. यातून बरे झाल्यानंतर त्यांनी आज जळगावातून आपल्या कामाचा नव्याने श्रीगणेशा केला.

    अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना प्रतिकाराची यंत्रणा अक्षरश: वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  प्रधानमंत्री रिलीफ फंडातून दिलेली 80 व्हेंटीलेटर्स अजूनही कार्यान्वित करण्यात आलेली नाहीत. रूग्णांना बेड मिळत नाही. खासगी हॉस्पीटल्समध्ये रूग्णांची मोठी लुट होत असून दहा दिवसांपर्यंत कोरोनाचे रिपोर्ट देखील मिळत नसल्याबद्दल आ. महाजन यांनी जिल्हाधिकारी, डीन आणि सिव्हील सर्जन यांना जाब विचारला. त्यांच्या रूद्रावतारासमोर अधिकारी निरूत्तर झाल्याचे दिसून आले.

    दरम्यान, भाऊंनी वरिष्ठ पातळीवरून बोलून जळगाव जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या जीवाशी न खेळता तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तर अनेक दिवसांपासून काम रेंगाळलेल्या मोहाडी येथील रूग्णालयाची पाहणी करून ते कामही मार्गी लावण्याचे सांगितले. गिरीशभाऊ हे आजच पश्‍चीम बंगालच्या निवडणुकीसाठी जात असून याआधी त्यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणांना कामाला लावल्याचे दिसून आले. अर्थात, भाऊंची अ‍ॅक्शन ही त्यांच्या मंत्रीपदाची आठवण करून देणारी ठरल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.