Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सर्व गेले पळून पोलीस आले धावून

Responsive Ad Here

गणेश शेवाळे प्रतिनिधी सेलू


      सेलु तालुक्यातील केळझर येथे एका कुटुंबातील व्रुध्द सदस्य कोरोना बाधित असल्याचे कळताच त्या परिवारातील सदस्यांनी पूर्णतः कानाडोळा करीत त्याला एकट्याला सोडून पलायन केले.हे कळताच सेलुचे ठाणेदार आपल्या सहकार्यासह कोणतीही तमा न बाळगता त्या रुग्णाचे घरी माणुसकीचा परिचय देत त्याचे घरी पोहोचले.मात्र त्या रुगणाला उचलण्या करिता आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी सुध्दा पुढे येत नसल्याचे पाहून खाकी वर्दीतील माणूसकी जागी झाली. कोरोना आजाराने तळपणार्या त्या एंशी व्रुध्दाला एक तासापासून ताटकळत वाट पाहात असलेल्या रुग्णवाहिकेत सेलु ठाणेदार सुनील गाडे यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने उचलून टाकले.परंतू तेव्हा पर्यंतघरुन पलायन केलेल्या एक ही परिवारातील सदस्याचा थांग पत्ता नव्हता.     

      इतक्यातच ते थांबले नसून जिल्ह्यात ६० तासाची कडक संचारबंदी असताना आपल्याला या अवधीत घरी जाता येणार नाही याची पुरेपुर माहिती असताना देखील घरुन सोबत आणलेला जेवणाचा डबा सुध्दा त्या उपाशी व्रुध्दाला भरवून दिले.पोलीसांवर ताशेरे मारणे जसे लोकांना सोपे वाटते तर त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे ही तितकेच गरजेचे आहे.म्हणून सगळे गेले पळून व पोलीस आले धावून. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.  सलाम आहे सेलु पोलीस.