Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भारतीय जनता युवा मोर्चा, तालुका-नांदगाव खंडेश्वर शहर व ग्रामीण यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

Responsive Ad Here

प्रदिप रघुते येनस

       अमरावती येथे दिनांक ११ मार्चला झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक चोरमले यांनी विद्यार्थी विद्यार्थीनीवर अमानुषपणे लाठीमार केला. पोलिसांचा आकस्मीक हल्ल्यामुळे सैरवैर आलेल्या विद्यार्थीनिवर अमानुषपणे लाठ्या फेकून मारल्या. सर्व विद्यार्थ्यांना वारंवार शिवीगाळ केली. २७ विद्यार्थी विध्यार्थीनिंना कोरोनाचे संकट असतांना सुद्धा पोलिसाच्या निळ्या गाडीमध्ये अमानुषपणे कोंबले. डॉ. अनिल बोंडे विद्यार्थ्यांवर गुन्हे लागू नयेत व अटक होवू नये म्हणुन निरीक्षक चोरमले यांना विनंती केली असता पोलीस निरीक्षक चोरमले यांनी उध्दटपणे वागणूक दिली व धक्काबुक्की केली. दडपशाहीने डॉ. अनिल बोंडे यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक चोरमले यांनी केलेल्या विद्यार्थ्यावरील लाठीमार व उधट वागणुकीकरीता त्यांना निलंबित करण्यात यावे व विद्यार्थ्यावरील लाठीमाराची चौकशी करण्यात यावी.

या प्रकरणानंतर दोन दिवस उलटल्यानंतर डॉ. अनिल बोंडे, सौ. निवेतीता दिघडे(चौधरी), श्री. प्रवीण तायडे, श्री बादल कुळकर्णी, श्री. प्रणीत सोनी, यांच्यावर विविध कलमा अन्वये सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले. राजकीय सूडबुद्धीने, बदल्याच्या भावनेने हे सर्व गुन्हे दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर दाखल केलेल्या गुन्हाच्या आम्ही तीव्र निषेध करतो. कोणतीही दडपशाही आम्हाला विध्यार्थी व जनतेला न्याय मागण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यावर पोलीस यंत्रणा वापरून दडपशाही करणाऱ्या शासनाच्या आम्ही निषेध करीत आहोत.

                                      निवेदन देते वेळी 

     भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सदस्य अमित दहातोंडे , तालुकाध्यक्ष  निकेत ठाकरे, शहराध्यक्ष राहुल गेडाम, सचिव रुद्रेश शिंदे.  नयन कणसे तालुका सरचिटणीस ,पंकज मेटे, विजय सोनवणे, जगदिष खेडकर ,निलेश पायगन ,अमोल घोंगडे ,अतुल जयसिंगपुरे ,अमोल  गुल्हाने ,ऋषी ढेपे जितेंद्र शिंदे, प्रफुल मानके, अक्षय मस्के, निलेश नेवारे, अंकुश ब्राह्मणवाडे  पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.