अतुलभाऊ भुसारी प्रतिनिधी सिंदखेड
बुलडाणा जिल्यातील होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे तरुण अभ्यासू तडफदार वरीष्ठ नेते अतुलभाऊ भुसारी पाटील जिल्हा अध्यक्ष अमोलभाऊ काकड यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती
नगरपालिका नगरपरिषद सर्व निवडणूका लढणार आहे .साखरखेरडा येथील,युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, प्रल्हाद सोरमारे,यांनी अतुलभाऊ भुसारी पाटील व अमोलभाऊ काकड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय समाज पक्षा मध्ये प्रवेश केला, आगामी काळात पक्ष वाढीसाठी त्यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली राष्ट्रीय समाज पक्ष हा गाव तिथं शाखा, घर तिथं कार्यकर्ता या उक्ती प्रमाणे आगामी काळामध्ये, राष्ट्रीय समाज पक्षाची घोडदौड कायम राहील, या प्रसंगी उपस्थित रमेश काळूसे सावखेड तेजन, देविदास गाटोळे जवळखेड, कारभारी गायकवाड लिंमगाव गुरू, महेश मुंढे सावंगी टेकाळे, योगेश मिसाळ, सिंनगाव जहांगीर, दत्ता पोंधे, खल्ल्याळ गव्हाण,, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

