गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल :-तालुक्यातील जळू-पळासदळ गृप ग्रामपंचायतीचे सरपंचपदी 'साई-ग्राम-विकास,पँनेलचे गुलाबसिंग चंद्रसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपसरपंच पदी पुनम उमेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या सभेस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य धनसिंग काशिराम पाटील,लिलाबाई शांताराम पाटील,सविता प्रविण पाटील,विमल सोमा भिल हे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रताप खाडे यांनी काम पाहीले. ग्रामसेवक आर.बी.पाटील,तलाठी शिंदे,सुनिल पाटील यांनी सहकार्य केले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. निवड जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

