Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वंचित बहुजन आघाडीचा विजय असो" या गजरात भूमिपूजनाचा कार्यक्रम मोरगाव भाकरे येथे संपन्न

Responsive Ad Here

  जिल्हा प्रतिनिधी पंकज शिरसाट

     आज दि.०१/०३/२०२१ रोजी माननीय आकाश दादा सिरसाट सभापती समाजकल्याण समिती जिल्हा परिषद अकोला यांच्यातर्फे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला, यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास कार्यक्रमा अंतर्गत ५५ लक्ष रूपयांचा विकासकामाचा भूमिपूजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 

@रस्ता कॉँक्रीटीकरण रोहिदासनगर १० लक्ष्य रुपये.

@रस्ता काँक्रीटीकरण अशोकनगर १० लक्ष्य रुपये.

@रस्ता काँक्रीटीकरण जुना बौद्धवाडा ८ लक्ष्य रुपये.

@सामाजिक सभागृह जुना बौद्धवाडा ७ लक्ष्य रुपये.

@रस्ता काँक्रीटीकरण बौद्धविहार वसती बाग ४ लक्ष्य रुपये.

@पाणी पुरवठा तथागतनगर ६ लक्ष्य रुपये.

@पाणीपुरवठा रोहिदासनगर ५ लक्ष रूपये.

@पाणीपुरवठा अशोकनगर ५ लक्ष्य रुपये.

      अशाप्रकारे ५५ लाख रूपयांचे भूमिपूजनाचा माननीय आकाश भाऊ शिरसाठ यांच्या हस्ते  कार्यक्रम संपन्न करण्यात आला.यामध्ये प्रमुख उपस्थिती गावचे सरपंच (उमाताई ज्ञानेश्वर माळी) उपसरपंच (अर्चनाताई गजानन चोपडे) तसेच सदस्य गन उपस्थितीत होते. तसेच ग्रामसचिव माननीय अनंत भाऊ वावगे सुद्धा उपस्थित होते. 

            मोरगाव भाकरे येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय अशोक पांडुरंग भाकरे सुद्धा उपस्थित होते.तसेच गावातील प्रतिष्ठत नागरिकांमध्ये माननीय सुरेश खडसे, ज्ञानेश्वर ढवळे, अर्जुन गावंडे, सत्यवान जंजाळ, दीपक जंजाळ,कुंदन जंजाळ, प्रवीण जंजाळ, दीप जंजाळ, पंकज शिरसाट, नाजूक गवई, आणि कॉन्ट्रैक्टटर किरण भाऊ सिरसाट व पप्पू बनसोडे हेसुद्धा उपस्थित होते.तसेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय प्रभू गुरुजी जंजाळ वंचित बहुजन आघाडी तालुका प्रसिद्धीप्रमुख या सर्वांच्या सहकार्याने हा समारंभ पार पाडण्यात आला .