लोणार तालुका प्रतिनिधी मो असलम परवेज
मोदी सरकारने लागू केलेल्या शेतकरी संबधीत तीन कायदे रद्द करणे व पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि इतर महागाई विरोधात देशभरातील ५०० शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदची हाक दिली होती. त्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर लोणार तहसील कार्यालयासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने भारतामध्ये वाढत असलेल्या महागाई विरोधात आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात आमरण उपोषण करण्यात आले. तसंच सर्व मांगण्या तात्काळ मंजूर करून दरवाढ आटोक्यात आणावे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना जीवन जगणे सरल होईल व शेतकरी संबंधित केंद्र सरकारने केलेले तिन्ही कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार सैफन नदाफ मार्फत करण्यात आली
या प्रसंगी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी, लोणार शहराध्यक्ष नितीन शिंदे, पक्षनिरीक्षक ठाकरे, नगर परिषद लोणार उपाध्यक्ष बादशाह सेठ, अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश समन्वयक साहेबराव पाटोळे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष शेख समद तसेच नगरसेवक गजानन खरात, भूषण मापारी, आबिद खान, तौफिक कुरेशी, रऊफ सेठ सोशल मीडिया शहराध्यक्ष मोहसीन शाह व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवेदन द्यायचे प्रसंगी उपस्थित होते.

