गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल:येथील तहसिलदार अर्चना खेतमाळीस ह्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या असुन त्यांच्या आईवडीलांनी त्यांना सरकारी सेवेत अधिकारी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या BSC(AGREE) असून त्यांचे पती सचिन गोरे हे डि. वाय. एस. पी पदी चाळीसगाव येथे कार्यरत आहेत.
त्यांच्या तहसिलदार पदाच्या कारकिर्दीची सुरूवात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापासून होऊन हिंगोली येथे C.E.O या पदाची धुरा सांभाळली,जवळपास तीन वर्षांपासून त्या एरंडोल येथे तहसिलदार पदाची सूञे प्रभावी पणे हाताळीत आहेत. महीला व पुरूष असा फरक न करता आपण एक अधिकारी आहोत या भावनेतुन मी आजवर काम केलेले आहे. त्यामुळे मला वरीष्ठ अधिकारी व महसूल यंञणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. एरंडोल तालुक्यातील नागरीकांचे सुध्दा मला वेळोवेळी सहकार्य लाभत असल्याने कोणतीही अडचण भासत नाही. असे त्यांना स्पष्ट केले.
