नागेश हजारे
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने व माजी मंत्री व आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र संघटन ज्ञानेश्वर माऊली सलगर यांच्या आदेशानुसार मोहोळ तालुक्यात वीज कनेक्शन तोडणी बंद करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध करत मोहोळ तालुक्यात तहसीलदार जीवन बनसोडे व पोलीस निरीक्षक सायकर साहेब व एम एस बी चे अधिकारी हारणाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले अधिवेशन काळात विधानसभेत झालेल्या चर्चेत महावितरण दोरी वीज ग्राहकांची वीज तोडणी बाबत थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडण्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी स्थगितीची आश्वासन दिले होते परंतु अधिवेशन संपताच वीज तोडण्याच्या संदर्भात देण्यात आलेल्या स्थगिती आली या दोन तोंडी शासन निर्णय व वीज जोडणी बाबत शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात शेतकरी विरोधी शासनाचा राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे कोरणा या महामारी च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात तसेच मार्च 20 20 पासून लॉक डाऊन करण्यात आले होते
यामुळे मार्च 20 20 पासून कोरोना चा निर्बंध खडक राबविल्याने शेतकऱ्याने पिकवलेला माल रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला असताना एन उन्हाळ्यात वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत ते त्वरित थांबविण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची पूर्ण जबाबदारी महावितरण ची असेल यावेळी उपस्थित तालुका संपर्क प्रमुख परमेश्वर पुजारी विधानसभा अध्यक्ष अभिमान काळे युवा नेते नागेश हजारे तालुका सचिव नवनाथ लेंगरे राजेंद्र वाघमोडे व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
