प्रदीप रघुदे प्रतिनिधी नांदगाव
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येणस येथील पत्रकार प्रदीप रघुते यांची दिल्ली येथील मानव संरक्षण विकास समितीच्या अमरावती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुऱ्हाडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र,गोवा,गुजरात,कर्नाटक आणि तेलगणा राज्याचे जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या शिफाशीनुसार महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष शिवाजी पाटील यांनी ही नियुक्ती केली असून प्रदीप रघूते यांना नियुक्तीचे पत्र सुद्धा पाठविले आहे.पत्रकार रघृते हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात आणि ते अपंग संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
