जामनेर प्रतिनिधी
डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेस( डी,जी, जी,आय) भारतात वस्तू व सेवा कर जीएसटी गुप्तचर महासंचालकांच्या केंद्रीय पथकाने नाशिक युनिट ने जामनेर तालुक्यातील पहूर येथे धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे आल्यानंतर प्रचंड खळबळ माजली आहे डी जीजीआय वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिजभूषण त्रिपाठी यांच्या पथकाने बुधवारीही धाड टाकली होती.
दरम्यान जीएसटी घोटाळ्याची संबंधित ते धाड सत्र होते त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटी पत्त्यावर मेडिकल सुरू असल्याचे आढळून आले आहे तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहीत नव्हते दरम्यान याप्रकरणी डी जी जी आय पथकाने दोघांना ताब्यात घेतले असल्याचे कळते.