प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद - शहरातील मनपा कोविड सेंटर पदुमपुरा येथे ही खळबळजनक प्रकार उघडकीस आलेला आहे.पीडित महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कोविड सेंटर येथे दाखल झाली एका डॉक्टरने सदरच्या महिला चा मोबाईल नंबर घेतला व तिला सतत फोन करत असे मंगळवारी रात्री दोन वाजता डॉक्टर ने महिलेस बळजबरी गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला या पीडित महिलेने डॉक्टरला विरोध करत आरडाओरड केली महिला चा आवाज मुळे सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला इतर कर्मचारी तेथे धाव घेत आलेले मध्यस्थी केली पीडित महिलेच्या नातेवाईकांनाही खबर कळताच ती तात्काळ कोविड सेंटर मध्ये दाखल झाले. व डॉक्टरला बेदम मारहाण केली सदर सेंटरमध्ये ओल्या पार्टीची चर्चा असून सुरक्षारक्षक यांना डॉक्टर शिवीगाळ करत असल्याची चर्चा आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले तसेच मनपा आयुक्त यांना ही माहिती मिळताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत डॉक्टर बडतर्फ होण्याची शक्यता अशा प्रकारामुळे डॉक्टर आणि पेशंट मधला नात्यांमध्ये विश्वास कसा ठेवायचा अशी लोकांमध्ये चर्चा आहे अशा कोविड सेंटरमध्ये महिला पेशंटची सुरक्षा ची हमी कोण देणार असा प्रश्न औरंगाबादकरांना पडलेला आहे.
