Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मध्यरात्री एलसीबी ने सापळा रचून अवैध रेती सह 12 लाख रुपयाची कारवाई

Responsive Ad Here

 राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगावराजा

    देऊळगाव राजा. तालुका प्रतिनिधी.रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. 10 एप्रिल पहाटे 1च्या सुमारास देऊळगाव मही तालुका देऊळगाव राजा परिसरात दोन ट्रॅक्टर पकडून 12 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमालासह त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. दोन्ही ट्रॅक्टर चालकांविरोधात देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सिताराम हरिचंद्र चव्हाण(39रा वार्ड क्रं 5 देऊळगाव राजा )व रवि लिंबाजी डीघोळे (22 रा वाकी खुर्द ता . देऊळगाव राजा) पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टर चालकांची नावे आहेत पोलीस सूत्रांनी सांगितले की काल रात्री अकराच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत रामराव जिंदमवार,पोहोकाॅ सय्यद हारुन विलास बाबुराव काकड. चालक पोहो काॅ शिवानंद मुंडे गस्त घालून होते त्यांना गोपी नियम माहिती दिली की, देळगाव मही परिसरात आज रात्री काही ट्रॅक्टर अवैधरित्या रेतिची चोरून वाहतूक करणार आहे.

       माहिती मिळताच एल सी बी चे पथक चिखली मार्ग देऊळगाव मही मध्ये मध्यरात्रीच आले 10 एप्रिल पहाटे एकच्या सुमारास देऊळगाव राजा दिशेने देळगाव मही कडे येताना दोन ट्रॅक्टर दिसले पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नव्हता दोन्ही चालकास पकडून ती सह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली एक ब्रास रेती दिसून आली. ही रेती खडक पूर्णा नदीतून आणल्याचे आरोपीने सांगितले दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली व रेती सह .12 लाख 10 हजार रुपयांची कारवाई करण्यात आली.