Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

घरकुल योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या घरकुलधारकांना ताबडतोब हप्ते द्या; सौ. सारिका राजेश डागा यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

   देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या मालकीचे घर असावे, या उद्देशातून प्रधानमंत्र्यांनी 'प्रधानमंत्री घरकुल योजना' कार्यान्वित केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत घरकुलधारकांना त्यांचा मंजुर झालेला पहिल्या हप्त्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी या मागणीसाठी नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ. सारिका राजेश डागा यांच्या नेतृत्वात नांदुरा शहरातील घरकुलधारक महिलांच्या वतीने आज *गुरुवार, दि. २२/०४/२०२१ रोजी मा. मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद नांदुरा यांना निवेदन देण्यात आले.



       नांदुरा शहरामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत ४५३ घरकुलधारकांचे घरकुल (डी. पी.आर.) मंजूर झालेले आहेत. परंतु सदर मंजूर घरकुलधारकांपैकी  काही घरकुलधारकांना पहिल्या हप्त्याची रक्कम अद्यापपर्यन्त मिळालेली नाही.सदर हप्त्याच्या रकमा केंद्र शासनाकडुन नगर परिषद कार्यालयाला प्राप्त झालेल्या असून कार्यालयामार्फत पहिल्या हप्त्याच्या रकमा लवकरात लवकर घरकुलधारकांना देण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.  तसेच ग्रीन झोन मध्ये असलेल्या घरकुल धारकांची नावे त्यामध्ये समाविष्ट करण्यात येऊन त्यांना घरकुलाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम ताबडतोब देण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. वरील बाबींवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ. सारिका राजेश डागा यांनी सदर निवेदनाद्वारे दिला. 

   या निवेदनावर घरकुलधारक रंजन ज्ञानदेव वसे, वनमाला गणेश वसे, संगीता विनोद इंगळे, नीता विजय वसे, कु. दुर्गा डिगांबर जांगडे, ग. भा. सुलोचनाताई डिगांबर जांगडे, पुष्पा प्रभाकर उंबरकर, मंदा रविंद्र जांगडे, ग. भा. लिलाबाई अमर जांगडे, आशा विनोद घोडके, रत्ना रामभाऊ इंगळे, जयश्री प्रल्हाद बोबडे, पुष्पा खापरे आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदन देतेवेळी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.