Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पंचायत समिती सदस्यावर मित्रानेच केला हल्ला

Responsive Ad Here

                                  


हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया

  हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत सिरसोली येथील घटना

      तेल्हारा पंचायत समितीचे सदस्य संजय हिवराळे हे सिरसोली येथे कामानिमित्त गेले असताना तेथे त्यांचा मित्र जयेश जयस्वाल याने उधारीचे पैसे मागितले. परंतु विवाद होऊन पैसे न मिळाल्याने जातीवाचक शिवीगाळ केली, आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली थापडा मारल्या आणि आरोपी जयेश जयस्वाल ह्याने संजय हिवराळे यांना जीवाने मारण्याच्या उद्देशाने पाय धरून त्यांचे डोके डांबरी सडकेवर दोन वेळा जोरात आपटले त्यामुळे त्यांच्या डोक्याला डांबरी सडकेचा मार लागला. सदर घटना विशाल दीपक तायडे आणि इतर लोकांनी पाहिली असल्याचा उल्लेख सुद्धा पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत आहे.

      सदर घटनेनंतर संजय हिवराळे यांना प्रथम तेल्हारा आणि तेथून अकोला येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  संजय हिवराळे यांचे वडील सुरेश हिवराळे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला उपरोक्त स्वरुपाची फिर्याद दिली असून जयेश जयस्वाल यांनी माझा मुलगा संजय हिवराळे याला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि गंभीर जखमी केले म्हणून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी फिर्याद दिली त्यावरून हिवरखेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून  पुढील तपास पीएसआय विठ्ठल वाणी आणि त्यांची चमू करीत आहे.