प्रतिनिधी
आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करत ,कुणी पायात चप्पल घालत नाही,कुणी चहा पीत नाही ,मिष्टान्नाच सेवन न करणे, घरात उत्सव साजरा न करण ,तर बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी मुंडन करणे आगळे वेगळे व्रत बलिदान मास निमित्त "स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवार ,शिवभारत सप्ताह समिती आणि "छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे" सदस्य स्वराज्यासाठी व मातृभूमी साठी केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करत अंगीकारत असतात.
१ फेब्रुवारी १६८९ रोजी ( माघ वद्य सप्तमी सह अष्टमी तिथी नुसार ) कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती शंभुराजे आपल्या सरदार सोबत बैठकीत असताना औरंगाजेबाचा सरदार मुकरब खान यांने अचानक हल्ला केला.शर्तीचा प्रयत्न करुन ही मराठे हा परतवू शकले नाही.अखेरीस शंभु राजे आणि कवि कलश मुघलांच्या तावडीत सापडले व त्यांना बंदी करुन बहादुरगड( धर्मवीर गड )येथे आणण्यात आले.
४० दिवस औरंगजेबाने शंभुराजांचा व कवि कलशाचा अत्यंत छळ केला.त्यांची धिंड काढली.प्रसंगी औरंगजेबाने शंभुराजांना धर्मातरांसाठी विविध आमिषे दाखवली. पण छत्रपती शंभुराजा नी आपला स्वाभिमानी बाणा दाखवत औरंगजेबाच्या यातना हसत हसत झेलल्या. नंतर शंभुराजांचे नेत्रकमळ तप्त सळई ने फोडण्यात आले ,त्यांची जिभा छाटण्यात आली.परंतु शंभुराजे डघमगळे नाहीत. औरंगजेब जेव्हा शंभुराजा कैद झाला म्हणुन खुदा चे आभार मानतो तेव्हा कवी कलशांनी लिहलेल्या काव्यपंक्ती शंभुराजाची शौर्य गाथा सांगतात.
राजन तुम हो साजे,
खुब लढे हो जंग .....
देख तव प्रताप महि,
तखतं त्यजत औरंग......
या ओळींचा अर्थ असा कि राज काय लढलात तुम्ही , काय तुमचे हे शौर्य ,औरंगजेब तुमचा पराक्रम पाहुन सिंहासन सोडुन तुमच्या पुढ्यात गुडघे टेकवुन नतमस्तक होत आहे.यानंतर ४० दिवस शंभुराजांवर अतोनात अत्याचार करण्यात आले.मृत्यूवर विजय मिळवत छत्रपती शंभुराजे "मृत्युजंय" झाले.
स्वराज्य इतिहासासाच्या पाऊलखुणा परिवाराचे सदस्य आवडत्या गोष्टीचा त्याग करण्या बरोबरच रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती अभियान ,दुर्गसंवर्धन तसेच शिवविचारा जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करत असतात.यामध्ये संदिप बर्शिले,गोरख कोटमे,नाना जाधव,अजय घिगे,कैलास दुघड,सचिन बिडवे,धनंजय बिडवे तसेच असंख्य शिवशंभु भक्त दरवर्षी सहभागी होत छत्रपती शंभुराजांना आदरांजली वाहत असतात.
