प्रतिनिधी जळगाव
युवकांसाठी सदैव उभा असेन-विश्वजितराजे जामनेर तालुक्यातील सुनसगाव ता.जामनेर- येथील विद्यार्थ्यी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. योग्य त्या सोईसुविधा नसल्याने व पुस्तके उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण होती. यासंदर्भात माहीती मिळताच युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांनी जामनेर विधानसभा क्षेत्रा तर्फे स्पर्धा परिक्षांची पुस्तके भेट देण्यात आली.
युवकांनो काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा तुमच्यासाठी सदैव उभा असेन असे मनोगत विश्वजितराजेंनी व्यक्त केले.सुत्रसंचालन सोनवणे सर तर आभार दत्ता साबळे यांनी मानले.
प्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील, शिवसेना तालुका नेते गणेशदादा पांढरे,शिवसेना गट प्रमुख विलासभाऊ मांडे,युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेशभाऊ जाधव,दत्तुभाऊ धनगर आणि सुनसगावचे दत्ताभाऊ साबळे,विलासभाऊ पाटील,सोनवणे सर व तरुण उपस्थित होते.

