तालुका प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे
कोरोना संकट डोईफोडे वाडी येथील श्री जगदंबा मातेची यात्रा रद्द करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील श्री क्षेत्र डोईफोडे वाडी येथील श्री जगदंबा मातेची 27 एप्रिल रोजी होणारी यात्रा महोत्सव कोरूना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्याचे गाव कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे .त्यामुळे यावर्षी ही भाविक स्वयंभू असलेली नवसाला पावणारी देवी म्हणून डोईफोडे वाडी येथील श्री जगदंबा देवी च्या दर्शनाला मुकणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे त्यामुळे मागील वर्षी यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला होता या वर्षी पुन्हा उन्हाळा सुरु होताच नव्याने कोरोना संख्या वाढतच चालली आहे .त्यातच शासनाने पंधरा दिवसाचा लॉकडाउन सुरू केला आहे 27 एप्रिल सकाळी सात वाजता देवीची पूजा होईल. व बारा गाड्या चा कार्यक्रम संध्याकाळी नाटकाचा कार्यक्रम 28 एप्रिल ला जंगी कुस्त्या होत असते.कोरोनाच्या यामुळे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले. असल्याचे डोईफोडे वाडी पंचांनी सांगितले आहे यावेळी . श्री सुरेश आश्रुबा डोईफोडे (मा.सरपंच) श्री कारभारी सटवाजी डोईफोडे (मा.सरपंच) श्री दिनकर हिम्मतराव डोईफोडे (पोलीस पाटील) श्री रतन नारायण डोईफोडे माजी सदस्य ग्रामपंचायत उपस्थित होते.
