लोणार शेख सज्जात
दि.२२ एप्रिल २०२१ रोजी जागतिक वसुंधरा दिवस निम्मित महाराष्ट्र पंचायत राज समिती चे अध्यक्ष( मंत्री पदाचा दर्जा) आणि आमदार श्री.संजयजी रायमुलकर साहेब यांनी नगर परिषद तर्फे विकसित करण्यात आलेल्या काटे नगर येथील घन वन प्रकल्प आणि फिल्टर प्लांट येथील गार्डन ल भेट दिली व नगर परिषद यांनी केल्याला कामाचे कौतुक केले व अश्या उपक्रमासाठी भरीव निधी देणार असे सांगितले व त्या साठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करण्यास सांगितले
यावेळी फिल्टर प्लांट येथे त्यांचा हस्ते वृक्षारोपण करून वसुंधरा दिवस साजरा करण्यात आले.लोणार नगर पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी स्व.खर्च आणि श्रमदान द्वारे फिल्टर प्लांट येथे गार्डन विकसित केले आहे .या ठिकाणी जवळपास ८००० स्केवर फूट जागेवर लॉन व इतर शोभेची वृक्ष लावण्यात आले तसेच उर्वरित जागेवर बांबू सह जवळपास ४०० वृक्ष लावण्यात आले,
लावण्यात आलेल्या सर्व वृक्षाची काळजी न प कर्मचारी श्री.काळबांडे आणि राजूरकर हे घेतात.नगर परिषद तर्फे मागील वर्षभरात शहर हद्दीमध्ये जवळपास ४००० वृक्ष लावण्यात आले आहेत आणि जवळपास सर्व वृक्ष जगवण्यात आली आहेत .
हे सर्व वृक्ष जगविण्यात ज्याचा मोलाचा वाटा आहे असे श्री.अशोक नीचंग आणि शेख सलीम यांचा मा.आमदार यांनी विशेष कौतुक केले.
या ठिकाणी मा.आमदार साहेब यांच्या हस्ते एक वडाचे झाड लाऊन वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला.या वेळी नप उपाध्यक्ष बादशाह खान, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापरी , काँग्रेस नेते साहेबराव पाटोळे, पांडुरंग सरकटे, न प आरोग्य निरीक्षक अशोक नीचंग, शेख सलीम, गजू बाजड हे उपस्थित होते.
