Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्पर्धावंतांनी धाडसी व्यक्तिमत्त्वासाठी बाबासाहेबांचे जीवनचरित्र अभ्यासावे:- अरूण भगत

Responsive Ad Here

प्रदीप रघु ते प्रतिनिधी अमरावती

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सार्सी द्वारा स्पर्धावंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    "धाडस ही अशी वस्तुस्थिती आहे की घाबरणारी व्यक्ती ती करु शकत नाही, आणि धाडस केल्याशिवाय इतिहासाची निर्मिती होऊ शकत नाही व  इतिहास निर्माण झाल्याशिवाय तुमच्या समाजाची, व्यक्तिमत्त्वाची परिस्थिती इतरांसमोर येत नाही, त्यामुळे स्पर्धावंतांनी धाडसी व्यक्तिमत्त्वासाठी बाबासाहेबांचे विचार अंगिकारने महत्त्वाचे आहे" असे प्रतिपादन मध्य रेल्वे नागपूर मंडल मधिल कार्यरत रेल्वे कर्मचारी अरूण भगत यांनी केले.ते सारसी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेद्वारे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


    सविस्तर वृत्त असे की, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सार्सी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेद्वारे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करून केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या विविध पदांवर रूजू झालेल्या स्पर्धांवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    २०१५ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून अभ्यासिकेचे संचालक प्रविण पाटील, मध्य रेल्वे मुंबई यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर गावातील विद्यार्थी युवकांनी स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर प्रमाणात यश संपादन करून गावाचे नाव चमकावले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त स्पर्धावंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक प्रदिप भालेकर व आभार दिनेश मेश्राम यांनी मानले.

    व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ. सोनाली ताई सवाई व गावचे पोलिस पाटील अमोल पाटील हे होते तर‌ प्रमुख पाहुणे म्हणून मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत कार्यरतअसलेले अरूण भगत, सुरज श्रीपाल सहारे, सामाजिक कार्यकर्ते समीर पटेल, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम सर, शिक्षक अडतराव सर, सदाशिव भालेकर, भागवत भालेकर, मंजिल मेश्राम (असिस्टेंट लोको पायलट), प्रशांत मरसकोल्ले ( टेक्नीशियन परेल वर्कशॉप मुंबई) व्यासपीठावर विराजमान होते.

    उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी समाजमंदिर मध्ये सुरू असलेल्या या अभ्यासिकेला अरूणभाऊ भगत यांचेकडून २१०० रुपये, सुरज सहारे यांचेकडून ११०० रूपये, पोलिस पाटील अमोल पाटील यांचेकडून ११०० रूपये किंमतीचे पुस्तके जाहीर करण्यात आली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अभ्यासिकमध्ये अहोरात्र मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करणारे विलास भालेकर ( टेक्शिनीयन, वेस्टर्न रेल्वे मुंबई), विपुल धंदर (वाहक, पुणे महानगरपालिका), निलेश खंडारे (टेक्निशियन, मध्य रेल्वे भुसावळ मंडल), शुभम भालेकर (टेक्निशियन, महामेट्रो मुंबई), अंकुश भालेकर ( टेक्निशियन, दक्षिण मध्य रेल्वे विजयवाडा) आदि स्थानिक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.