प्रदीप रघु ते प्रतिनिधी अमरावती
गट विकास अधिकारी यांच्या दालनात आमरण उपोषण
नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत खानापूर गटग्रामपंचायत स्थित गोळेगाव येथील रहिवाशी श्याम कुणबीथोप यांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा खानापूर येथील हेकेखोर ग्रामसेवक व राजकीय पाठबळामुळे खानापूर येथील सरपंच व उपसरपंच व तीन सदस्याचे अवैद्य अतिक्रमण असून संबंधित ग्रामसेवक योगिता चव्हाण यांनी लेखी पत्राद्वारे ८-अ देण्यास सरळ नकार दिला संबंधित पंचायत समिती ग्राम विस्तार अधिकारी यांना निवेदन देऊन अद्यावत कोणतीही कारवाई केली नाही .मात्र संबंधित ग्रामसेवक व प्रशासनाकडून तक्रारकर्ता यांच्याशी मुजोरीची व वागणुकीनंतर तक्रारकर्ते श्याम कुणबीथोप अखेर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली .
तक्रार कर्त्याच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत सन 2012-13 चे गाव नमुना 8 व 2019-20 चे नमुना 8 मिळत नाही संबंधित ग्रामसेवक निलंबित होत नाही . तोपर्यंत माझं आमरण उपोषण कायम राहील असे उपोषण कर्ते यांनी सांगितले उपोषण करते शाम कुणबीथोप व सहकारी निलेश मुधोळकर , सुनील दळवी, दिनेश पांडे, विनोद भेंडे आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी विनोद खेडकर
खानापूर ग्रामपंचायत अंतर्गत विषय असून ग्रामसेवक यांनी मागणीनुसार विषय हाताळणे योग्य होते मात्र माझ्या कार्यालयासमोर काल रोजी उपोषण सुरू केले उपोषण कर्त्याला न्याय मिळावा याकरिता कारवाई उचित करण्याचे आदेश मी दिले आहे
